अहिर भैरव हा सकाळचा राग आहे आणि 'अहिर' हा शब्द म्हणजे गोपाळ. हा राग पहाटे गायीच्या घंटा वाजवण्यापासून विकसित झाला आहे. एखाद्या व्यक्तीवर पहाटे किती शांत प्रभाव पडतो याची कल्पना करण्याची गरज नाही. भजने बहुतेकदा अहिर भैरव रागावर आधारित असतात यात काही आश्चर्य नाही.
कोमल रे आणि कोमल नी वापरणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ही पद्धत भातखंडे यांनी मांडलेल्या 10 पैकी कोणत्याही प्रकारची नाही; मात्र काही अगम्य कारणास्तव त्यांनी हा राग भैरव थाटामध्ये घातला. या रागाला दक्षिण भारतीय चक्रवाक नावाने संबोधले जाते.
अहिर भैरव या रागावर आधारित काही सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गाणी आहेत, मन्ना डे यांनी गायलेली 'पूछो ना कैसे मैं बारिश बिताई' , 'मेरी बिना तुम बिन रोये सजना' या जुन्या चित्रपट गीतांमधून अहिर भैरव खूप ओळखला जातो. आणि उस्ताद रशीद खान यांनी गायलेली 'अलबेला साजन आयो रे' खरंतर अहिर भैरवामध्ये खुप फिल्मी गाणी आहेत.
अहिर भैरव रागातील गाणी
1) अलबेला सजन आयो रे - चित्रपट - हम दिल दे चुके सनम (1999)
2) मन आनन्द आनन्द छायो - चित्रपट - विजेता (1983)
3) मेरी वीणा तुम बिन रोये - चित्रपट - देख कबीरा रोया (1957)
४) पूछो ना कैसे मैने रैन बिताई - चित्रपट - मेरी सूरत तेरी आंखे (1963)
५) राम तेरी गंगा मैली हो गई - चित्रपट - राम तेरी गंगा मैली (१९८५)
6) सोलाह बरस की बाली उमर को सलाम - चित्रपट - एक दुजे के लिए (1981)
७) वक्त करता जो वफा आप हमारे होते - चित्रपट - दिल ने पुकारा (1967)
8) जिंदगी को संवारना होगा - चित्रपट - आलाप (1977)
9) मैं तो कब से तेरी शरण में हूं - चित्रपट - राम नगरी (1982)
10) माई री मैं कसे कहूं - चित्रपट - दस्तक (1970)
11) धीरे धीरे सुबह हुई हुई जाग उठी जिंदगी - चित्रपट - हैसियत (1984)
12) अब तेरे बिन जी लेंगे हम - चित्रपट - आशिकी (1990)
13) चलो मन जाएंगे घर आपने - चित्रपट - स्वामी विवेकानंद (1994)
14) अपने जीवन की उलझन को - चित्रपट - उलझन (1975)
15) लगन लागी - चित्रपट - तेरे नाम (2003)
16) और हो - चित्रपट - रॉकस्टार
17) जयशंकरा गंगाधरा (मराठी)
18) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल - अभंग (मराठी)
19) हरी भजनाविण काळ घालवू नको रे (मराठी)
20) हिरवा शालू हिरावी चोली (मराठी)
For English article please click on links below
https://meetkalakar.com/Artipedia/Ahir-Bhairav
You tube link -
https://www.youtube.com/watch?v=MWJQvDpHDXo
No comments:
Post a Comment